Last Updated: Monday, June 25, 2012, 16:32
www.24taas.com, पेहलगाम अमरनाथ यात्रेला आज सोमवारपासून सुरूवात झाली असली तरी पावसाचा जोर वाढल्याने यात्रेत अडथळा निर्माण झाला आहे. हजारो यात्रेकरूंना बालताल येथून तीन किलोमीटर असलेल्या डूमेल येथे ऱोखण्यात आले आहेत.
बालतालच्या निरीक्षण कक्षापासून अमरनाथपर्यंतच्या १४ किलोमीटरच्या रस्त्यावर जोरदार पावसाला सुरवात झाली असल्याची माहिती केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली. मात्र, पावसावर मात करत हेलिकॉप्टरच्या साहाय्याने हजारो यात्रेकरू अमरनाथला पोहोचले आहेत, त्यांच्यासमवेत काश्मीरचे राज्यपाल व देवस्थान मंडळाचे अध्यक्ष एन. एन. व्होरा हेही आहेत. त्यांच्या हस्ते अमरनाथ येथील शिवलिंगाचे आज सकाळी पूजन करून यात्रेची औपचारिक सुरवात करण्यात आली.
संबंधित आणखी बातमी
अमरनाथ यात्रेला आजपासून सुरुवातशनिवारपासून अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत असल्याने हवामान अधिक बिघडण्याची शक्यता असताना आज सोमवारपासून अमरनाथ यात्रेला सुरुवात झाली आहे.
First Published: Monday, June 25, 2012, 16:32