Last Updated: Wednesday, June 27, 2012, 07:44
www.24taas.com, पहलगाम लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या अमरनाथ यात्रेला सोमवारपासून सुरुवात झालीय. या यात्रेसाठी निघालेला पहिला जत्था मार्गावर असताना भक्तांचा दुसरा जत्था रवाना झालाय.
बदलत्या हवामानामुळं यात्रेकरुंना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. त्यातच हवामान खात्यानं पुन्हा एकदा पावसाचं भाकित वर्तवलंय. त्यामुळं यात्रेकरुंना अडचणींचा सामना करत मार्गक्रमण करावं लागणार आहे. अमरनाथच्या गुंफेत यंदा १८ फूटाचं शिवलिंग बनलंय. त्याचं दर्शन घेण्यासाठी अडचणींचा मुकाबला करत यात्रेकरु मार्गक्रमण करत आहेत. यात्रेकरुंच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनानंही चोख व्यवस्था केलीय.
.
First Published: Wednesday, June 27, 2012, 07:44