Last Updated: Tuesday, July 3, 2012, 13:21
www.24taas.com, गांधीनगर नरेंद्र मोदींविरोधात भाजपामध्येच वातावरण तापत चालल्याचं वारंवार समोर येत आहे. मोदींवरून माजत असलेल्या दुफळीचं आणखी एक उदाहरण समोर आलं आहे. नरेंद्र मोदींच्या आधी गुजराथचे मुख्यमंत्री असणाऱ्या भाजपा नेते केशुभाई पटेल यांनीही नरेंद्र मोदींविरोधात बंड पुकारलं आहे.
वरिष्ठ भाजपा नेते केशुभाई पटेल यांनी नरेंद्र मोदींवर टीका करत भाजपा सदस्यांना आवाहन केलं आहे की विधानसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींना मुळीच पाठिंबा देऊ नये. नरेंद्र मोदी यांना पुन्हा मुख्यमंत्री होण्याची संधी देऊ नका असी विनंती पटेल यांनी केली आहे.
पटेल यांनी आपल्या नव्या ब्लॉगमध्ये लिहिलं आहे की मी सर्व कार्यकर्त्यांना आवाहन करतो की त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून नरेंद्र मोदींना पुन्हा निवडून देऊ नका. नरेंद्र मोदींच्या विरोधात नवा राजकीय मंच उभा करण्याचे संकेत पटेल यांनी आधीही दिले होते. त्यामुळे नरेंद्र मोदींना आणखी एका अडचणीला तोंड द्यावं लागणार आहे.
First Published: Tuesday, July 3, 2012, 13:21