विजयानंतर मोदींनी केलं केशूभाईंचं तोंड गोड

Last Updated: Thursday, December 20, 2012, 17:26

स्पष्ट बहुमत मिळऊन भाजपाच्या नरेंद्र मोदींनी आपलं मुख्यमंत्रीपद राखलं आहे. 116 जागांवर विजय मिळवत पाचव्यांदा मुख्यमंत्री बनले. विजय संपादन केल्यावर नरेंद्र मोदी प्रथम आपल्या आईला भेटले आणि त्यांनंतर त्यांनी आशीर्वाद घेतला तो केशूभाई पटेल यांचा.

सिद्धूचं भाषण, भाजपलाच टेन्शन

Last Updated: Tuesday, December 4, 2012, 16:49

आपल्या क्रिकेटमधील फलंदाजीइतकंच आपल्या वक्तव्यांबद्दल प्रसिद्ध असलेल्या नवज्योतसिंग सिद्धूला गुजरातमध्ये प्रचारसाठी भाजपाने बिग बॉस-6मधून बाहेर बोलावून घेतलं. मात्र, त्याच्या बेछुट वक्तव्यांमुळे भाजपलाच कापरं भरलं आहे. त्यामुळे सिद्धूने प्रचारादरम्यान संयमाने बोलावं असे निर्देश त्याला देण्यात आले आहेत.

केशुभाई पटेलांचा राजीनामा, मोदींना झटका

Last Updated: Saturday, August 4, 2012, 21:07

गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल आणि माजी केंद्रीय मंत्री कांशीराम राणा यांनी आज भारतीय जनता पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यामुले भाजपला जोरदार झटका बसला आहे. पटेल हे पक्ष काढण्याच्या स्थितीत आहेत.

केशूभाईंनी ओकलं गरळ, म्हणे मोदी 'सडकं फळ'!

Last Updated: Thursday, July 19, 2012, 17:31

गुजराथचे माजी मुख्यमंत्री केशूभाई पटेल यांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदींवर आगपाखड केली आहे. गेल्यावेळी मोदींना हिटलरची उपमा देऊन झाल्यावर यावेळी केशूभाईंनी मोदींना सडक्या फळाची उपमा केली आहे. नरेंद्र मोदी म्हणजे सडकं फळ असून त्यांना फेकून दिलं पाहिजे असं वक्तव्य केशूभाईंनी केलं आहे.

नरेंद्र मोदींवर केशुभाईंचा प्रहार

Last Updated: Tuesday, July 3, 2012, 13:21

नरेंद्र मोदींविरोधात भाजपामध्येच वातावरण तापत चालल्याचं वारंवार समोर येत आहे. मोदींवरून माजत असलेल्या दुफळीचं आणखी एक उदाहरण समोर आलं आहे. नरेंद्र मोदींच्या आधी गुजराथचे मुख्यमंत्री असणाऱ्या भाजपा नेते केशुभाई पटेल यांनीही नरेंद्र मोदींविरोधात बंड पुकारलं आहे.

मोदींविरोधात मोर्चेबांधणीला जोर...

Last Updated: Wednesday, May 30, 2012, 16:20

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. माजी मुख्यमंत्री केशूभाई पटेल यांच्यासह दहा वरिष्ठ नेत्यांनी मोदींच्या विरोधात रणनिती आखण्यासाठी बैठक बोलावली आहे.