दीड वर्षानंतर उलगडलं 'लैला'चं रहस्य - Marathi News 24taas.com

दीड वर्षानंतर उलगडलं 'लैला'चं रहस्य

www.24taas.com
 
 
इगतपुरीहून बेपत्ता झालेली अभिनेत्री लैलाखान हिची आई आणि बहिणीसह हत्या करण्यात आलीय. लैला खान हे नाव बॉलीवुडमध्ये गाजलं होतं ते तिच्या अंडरवर्ल्ड कनेक्शसाठी. पण पडद्यावर बोल्ड असणारी लैला वास्तवात मात्र दहशतवादी कारवायात नाव गुंतल्यामुळे आणखीनच घातक झाली होती.
 
लैला खान.. हे तेच नाव आहे ज्याच्या शोधात कधीकाळी बॉलीवूडचे निर्माते असायचे. पण गेल्या काही दिवसापासून या नावाच्या शोधात असणा-या सुरक्षा यंत्रणाचा, लैला खानच्या नावामागे ससेमिरा लागलाय.  कधीकाळी लेट नाईट पार्ट्या आणि बॉलीवूडच्या पार्ट्याच्या गॉसिप न्यूज असणारी लैला आता गुन्हेगारी जगतातील सर्वात मोठी घडामोंडीचे केद्र ठरली आहे.  या लैला खानवरील आरोप एवढे गंभीर होते की,  कुणीही एकून थक्क होईल. कारण जगासमोर आलेल्या आतापर्यंतच्या पुराव्याने  तिच्यावरील सर्व आरोपांना बळकटी मिळतेय. बॉलीवूडमध्ये आपलं नशिब अजमवण्याची धडपड करणा-या लैलानं  अंडरवर्ल्ड्मध्ये  आपलं स्थान मात्र हळूहळू पक्क केल होत. केवळ एवढच नाही तर लैलाला  ओळखणा-या अनेक व्यक्तीनी लैलाच्या संपर्कात अंडरवर्ल्डमधल्या अनेक व्यक्ती असल्याच्या माहिती तपासयंत्रणाना दिली होती. माहितीगारांच्या म्हणण्यानुसार, लैलाना भेटणा-यांमध्ये  दूबई आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या निकटवर्तीयाचा  भरणा जास्त असायचा.
 
अंडरवर्ल्डमध्ये दडलेल्या लैलाच्या अनेक काळ्या रहस्यांचा पर्दाफाश झालाय. केवळ एवढच नाही तर हायकोर्टाबाहेर झालेल्या  बॉम्बस्फोटावेळीही लैला खानच्या गाडीचा वापर करण्यात आल्याचा दाट संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. या सा-या घडामोडीनंतर लैला खानच्या मृत्युच्या बातमीनं लैला खान या नावाभोवतीचं रहस्य आणखीनच गूढ केलय.

 

First Published: Thursday, July 5, 2012, 23:21


comments powered by Disqus