Last Updated: Sunday, July 8, 2012, 12:37
www.24taas.com, नवी दिल्ली आगामी विधान परिषद निवडणुकांसाठी काँग्रेसच्या उमेदवारांच्या नावांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी शनिवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींची भेट घेतली.
मात्र उमेदवारांची नावं निश्चित करण्यासाठी 12 जुलैला आणखी एक बैठक होणार असल्याची माहिती आहे. विधान परिषदेत काँग्रेसचे चार आमदार निवृत्त होत आहेत. मात्र विधानसभेतील संख्याबळानुसार तसच बदललेल्या राजकीय समीकरणांनुसार चारऐवजी तीन जागा लढण्याचा काँग्रेसचा विचार आहे.
मावळत्या आमदारांपैकी माणिकराव ठाकरे आणि उल्हास पवार यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तर तिस-या नावासाठी मुस्लिम समाजातील अनेक इच्छुकांसह मुख्यमंत्र्यांसाठी आमदारकीचा राजीनामा देणारे संजय दत्त यांचं नाव चर्चेत आहे.
First Published: Sunday, July 8, 2012, 12:37