नीतिश कुमारांच्या जनता दरबारात काडतुसे! - Marathi News 24taas.com

नीतिश कुमारांच्या जनता दरबारात काडतुसे!

www.24taas.com, पाटणा
बिहारचे मुख्यमंत्री नीतिश कुमारांच्या 'जनता दरबारात' पोलिसांनी एकाला सहा जिवंत काडतुसांसह ताब्यात घेतले. हितेश असे या व्यक्तीचे नाव असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
 
हितेशच्या कारमधून पिस्तूलही पोलिसांनी जप्त केली आहे. जप्त करण्‍यात आलेली पिस्तूल हितेशची आहे की नाही, याचा पोलिस तपास करत आहे.
 
नीतिश कुमारांकडे आठवड्याच्या दर सोमवारी जनता दरबाराचे आयोजन केले जाते. यात मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित असतात. सर्वाची प्रवेशद्वारावरच तपासणी करण्यात येते. परंतु कडक तपासणीनंतरही हितेश जिवंत काडतुसे जनता दरबारात घेऊन कसा गेला असावा, असा प्रश्न पोलिसांसह सगळ्याना पडला आहे.
त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेचे धिंडवडे उडविणाऱ्या पोलिसांनाही हे प्रकरण जास्त महागात पडणार असल्याचे दिसून येत आहे.
 

First Published: Monday, July 9, 2012, 18:10


comments powered by Disqus