Last Updated: Tuesday, April 10, 2012, 09:05
१५ एप्रिल रोजी येथे आयोजित करण्यात आलेल्या 'बिहार दिन' कार्यक्रमाला आपल्याला कोणीही अडवू शकत नाही, असे दंड आता नव्याने मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी थोपटले आहेत. त्यामुळे ज्याला काही सन साजरे किंवा दिन साजरे करायचे आहेत, ते त्यांनी आपल्या राज्यात साजरे करावेत, महाराष्ट्रात येऊन त्याचे राजकारण करू नये, गाठ माझ्याशी आहे, असे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याआधी दिले होते. त्यामुळे कडवा विरोध दर्शविणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला नीतिशकुमार यांनी खुले आव्हान दिल्याचे म्हटले जात आहे.