काँग्रेसला नवीन विचारधारेची गरज - खुर्शीद - Marathi News 24taas.com

काँग्रेसला नवीन विचारधारेची गरज - खुर्शीद

www.24taas.com, नवी दिल्ली   
 
पक्षासाठी शेवटचं आशास्थान असलेल्या राहुल गांधी यांनी जबाबदारी स्विकारण्याची गरज आहे. मात्र, ते जबाबदारी स्विकारत नाहीत, असं कायदामंत्री सलमान खुर्शीद यांनी म्हटलंय. काँग्रेसला नवीन विचारधारेची गरज असल्याचं खुर्शीद यांनी यावेळी म्हटलंय.
 
एका इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत खुर्शीद यांनी आपले विचार व्यक्त केलेत. युपीए सरकारच्या कारभारावर खुर्शीद यांनी बोट ठेवलंय. ‘सध्या आपल्याला नवनवीन आव्हानं स्विकारण्यासाठी नवीन विचारधारेची गरज आहे. १९९० साली केलेल्या सुधारणा त्यावेळची गरज होती. पण आता आपल्याला नवीन विचारधारेची अपेक्षा पुढच्या पिढीकडून आहे. या पिढीचं नेतृत्व राहुल गांधी यांनी पुढे येणं गरजेचं आहे. पुढच्या निवडणुकांना सामोरं जाण्यासाठी आपल्याला काय हवंय, यासंबंधी स्पष्टता खूप महत्त्वाची आहे’, असं सलमान खुर्शीद यांनी म्हटलंय. ‘काँग्रेसला नवीन विचारधारेची गरज’, या वक्तव्यावरून मात्र खुद्द काँग्रेस पक्षात आणि विरोधकांच्या गोटातूनही प्रतिक्रीया उमटण्याची चिन्ह आहेत.

First Published: Tuesday, July 10, 2012, 11:38


comments powered by Disqus