Last Updated: Tuesday, July 17, 2012, 17:41
www.24taas.com, रायपूर 
छत्तीसगडचे मुख्यमंत्री डॉक्टर रमण सिंह यांनी आपल्या अक्कलेचे तारे तोडले आहेत. रमण सिंह यांनी सांगितले की, मुलांच्या अपराधासाठी त्यांचाबापाला शिक्षा केली गेली पाहिजे. रमण सिंह यांच्यामते जर का मुलगा काही गुन्हा करीत असेल तर अपराधी तो मुलगा नाही तर त्याचे वडील असतील. त्यांनी असं म्हटलं की, जर का ंमुलगा काही अपराध करीत असेल तर त्याला शिक्षा न करता त्याचा बापाला शिक्षा करा.
रमण सिंह यांनी नवाच जावईशोध लावला आहे. की मुलगा हा गुण त्याचा बापाकडून घेत असतो. जर का कोणी चोरी करीत असेल की दरोडा टाकत असेल, किंवा बलात्कार करीत असेल तर त्यात मुलाचा दोष नाही. तर जसं बापाचं रक्त तसट मुलाचं देखील असतं.
रमण सिंहांच्या मते, आज विज्ञानाने इतकी प्रगती केली की, आपण आपल्याला आवडणाऱ्या व्यक्तीला जन्म देऊ शकतो. रमण सिंहच्या मते, आणि तो दिवसही दूर नाही की स्टेम सेलच्या मदतीने हजारो ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन तयार करता येतील.
First Published: Tuesday, July 17, 2012, 17:41