Last Updated: Monday, July 23, 2012, 20:33
www.24taas.com, नवी दिल्ली 
पेट्रोलचा भडका पुन्हा एकदा झालेला आहे. काही दिवसापूर्वी जवजवळ ७.५० रूपयाने वाढ केल्यानंतर, पुन्हा ४ रूपयाने त्यात कपात करून जखमेवर मलम लावण्याचा प्रयत्न सरकारने केला खरा मात्र आता पुन्हा एकदा पेट्रोलमध्ये ७० पैशाने दरवाढ केलेली आहे. आणि त्यामुळेच ऐन महागाईत पुन्हा पेट्रोलचा भडका उडाला आहे. नवे दर आज मध्यरात्रीपासूनच लागू होणार आहेत.
राष्ट्रपती निवडणूक संपताच पेट्रोल ७० पैशांनी महागले आहे. आधीच महागाईने होरपळलेल्या सामान्य जनतेच्या खिशाला कात्री लागणार आहे. तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात प्रति लीटर ७० पैशांनी वाढ केली आहे. सोमवारी मध्यरात्रीपासून ही दरवाढ लागू केली जाणार आहे.
पेट्रोलचे नवे दर पुढील प्रमाणे ठाणे- ७९.६२ प्रति लीटरनागपूर- ७८.०९ प्रति लीटरसोलापूर- ७७.५२ प्रति लीटरऔरंगाबाद- ७३.५९ प्रति लीटररत्नागिरी- ७३.२५ प्रति लीटरदिल्ली- ६८.४८ प्रति लीटरभोपाळ- ७३.५१ प्रति लीटर
First Published: Monday, July 23, 2012, 20:33