'जंतरमंतर'वर सरकारविरोधात अण्णांचा एल्गार - Marathi News 24taas.com

'जंतरमंतर'वर सरकारविरोधात अण्णांचा एल्गार

www.24taas.com, नवी दिल्ली
नुकतंच पद ग्रहण करणारे भारताचे १३ वे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यासह १५ भ्रष्ट मंत्र्यांच्या चौकशीच्या मागणीसाठी टीम अण्णा सदस्य आजपासून दिल्लीत जंतरमंतरवर उपोषणाला बसली आहे. स्वत: उपोषण करित नसले तरी अण्णाही यावेळी जंतरमंतरवर सदस्यांसोबत उपस्थित राहिले आहेत. आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी युवक काँग्रेसच्या सदस्यांनी घोषणाबाजी करून गोंधळ घालण्याचाही प्रयत्न केला.
 
उपोषणाला बसण्यापूर्वी टीम अण्णांन अण्णा हजारेंसह राजघाटावर जाऊन गांधींजींच्या समाधीचं दर्शन घेतलं. या आंदोलनाच्या निमित्तानं अण्णा हजारेंनी सरकाराला चार दिवसांचा अल्टिमेटम दिलाय. आपली मागणी पूर्ण झाली नाही, तर पाचव्या दिवशी अण्णाही उपोषणाला बसणार आहेत. लोकपालवरुन सरकार सातत्यानं फसवणूक करत असल्याचा अण्णांनी केलाय.
 
दरम्यान, अण्णांच्या आंदोलनात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. जंतरमंतरवर गोंधळ घडवून आंदोलन उधळण्याचा डाव मात्र सजग कार्यकर्त्यांमुळे यशस्वी होऊ शकला नाही.
 
.

First Published: Thursday, July 26, 2012, 11:03


comments powered by Disqus