मायावतींच्या पुतळ्यावर नवनिर्माण सेनेचा प्रहार - Marathi News 24taas.com

मायावतींच्या पुतळ्यावर नवनिर्माण सेनेचा प्रहार

www.24taas.com, लखनऊ
 
उत्तर प्रदेशाच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांचा पूर्णाकृती पुतळा फोडण्यात आला. हा पुतळा  नवनिर्माण सेनेनेच्या कार्यकर्त्यांनी तोडल्याचे सांगण्यात येत आहे.त्यामुळे या प्रकणावरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
 
लखनऊमधील आंबेडकर पार्कमधील मायावतींचा पुतळा फोडण्यात आला आहे.  एका बाईकवरून आलेल्या दोघांनी हा पुतळा तोडल्याचे सांगण्यात येत आहे. पुतळ्याची मानच हातोड्याने तोडण्यात आली आहे.
 
या पार्कमध्ये काशीराम यांचाही पुतळा आहे.   काही मुलं बाईकवरून आलीत. त्यांनी सहा फुट लांब असणाऱा मायावतींचा पुतळा टार्गेट केला. हातोडा घेवून पुतळ्याची मानच तोडली. याबाबत उत्तर प्रदेश नवनिर्माम सेनेकडे संशयाने पाहिले जात आहे. कारण याठिकाणी एक चिठ्ठी सापडली आहे. त्यामुळे हा संशय व्यक्त केला गेला आहे.
 
दरम्यान, या घटनेची मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी निंदा केली आहे. या घटनेला सरकारच जबाबदार असल्याचे बसपाने म्हटले आहे. तर काँग्रेस आणि बीजेपीने या घटनेचा निषेध नोंदवला आहे.

First Published: Thursday, July 26, 2012, 17:36


comments powered by Disqus