भारतीय रेल्वे - सर्वांत मोठं 'उघड्यावरील शौचालय'! - Marathi News 24taas.com

भारतीय रेल्वे - सर्वांत मोठं 'उघड्यावरील शौचालय'!

www.24taas.com, नवी दिल्ली
 
देशाची लाईफ लाईन आसलेली रेल्वे ही जगातील सर्वात मोठं उघड्यावरील शौचालय आसल्याची जोरदार टीका केंद्रिय ग्रामीण विकास मंत्री जयराम रमेश यंनी केली. जयराम रमेश यांनीही हे वक्तव्य जैव शौचालयास निधी मिळवण्यासंबंधी केली.
 
जयराम रमेश यांच्या माहीतीनुसार उघड्यावर शौचास बसणाऱ्यांमध्ये भारत हा जगातील एक नंबरचा देश आहे. जगातील उघड्यावर शौचास बसणा-यांपैकी ६० टक्के जनता ही भारतातील आहे. रोज ११ लाख प्रवासी उघड्यावरती शौचास बसतात. ही एक मोठी लाजिरवाणी बाब आहे. भारतातील स्वच्छतेच्या समस्येचं दुसरं रुप रेल्वे असल्याची जोरदार टीकाहि त्यांनी केली.
 
आपण पेयजल आणि स्वच्छता मंत्री आसल्यामुळे रेल्वेमध्ये किती स्वच्छता असते हे मला माहित आहे असं जयराम रमेश म्हणाले. उपलब्ध आसणा-या गाड्यांपैकी फक्त ९ गाड्यांमधील ४३६ डब्यांमध्येच जैव शौचालये आहेत.

First Published: Friday, July 27, 2012, 20:29


comments powered by Disqus