विद्यार्थ्यांना संडास धुवायला लावले

Last Updated: Monday, March 18, 2013, 14:40

शिक्षा म्हणून संडास धुवायला लावल्याने एका शिक्षिकेविरोधात नाराजी व्यक्त होत होती. विद्यार्थ्यांना अमानुष शिक्षा दिल्याप्रकरणी दादरमधल्या द एन्टोनिओ डीसिल्वा शाळेतल्या एका शिक्षिकेला निलंबित करण्यात आलंय.

शौचालय बांधा, बलात्कार टाळा- जयराम रमेश

Last Updated: Sunday, January 13, 2013, 15:58

केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी शनिवारी रायपूर येथे बलात्करांमागच्या कारणांबद्दल मत मांजताना त्यांचा संबंध थेट शौचालयांशी लावला आहे. ग्रामीण भारतातजोपर्यंत घरोघरी शौचालयं बांधली जात नाहीत, तोपर्यंत बलात्कारासारख्या घटना कमी होणार नाहीत, असं रमेश म्हणाले.

‘नवऱ्यांनो शौचालयं बांधून द्या, नाहीतर उपाशी राहा!’

Last Updated: Tuesday, October 9, 2012, 21:19

‘नवऱ्यांनो शौचालय बांधून द्या, नाहीतर उपाशी राहा’ असा इशारा दिलाय बुलढाण्यातल्या दिवठाना गावातल्या महिलांनी... महिलांनी ग्रामसभेत यासंदर्भातला ठराव पारीत केला. यामागणीचा विचार होईल आणि लवकरच हे गाव हगणदारीमुक्त होईल अशी आशा गावातल्या महिलांना आहे.

'शौचालयात घोटाळा' आव्हाडांचा सोमय्यांवर आरोप

Last Updated: Sunday, September 30, 2012, 08:53

मुंबईमध्ये शौचालयं बांधण्याच्या कामात मोठ्या प्रमाणावर घोटाळा झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनीच शौचालय बांधकामामध्ये कोट्यावधींचा भ्रष्टाचार केला आहे, असं जितेंद्र आव्हाड यांचं म्हणणं आहे.

'आरएसएस' म्हणजे रुरल स्वदेशी संडास- दिग्विजय सिंग

Last Updated: Friday, August 24, 2012, 23:30

आपल्या वाचाळतेसाठी प्रसिद्ध असलेल्या काँग्रेसच्या दिग्विजय सिंग यांनी पुन्हा एकदा बेताल वक्तव्य करून वाद ओढावून घेतलाय. दिग्विजय सिंग यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना गावठी संडासाशी केली आहे. देशाच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर शौचालयांची गरज असल्याचं सांगत दिग्गीराजांनी यावर कडी करत शौचालयांना `रुरल स्वदेशी संडास` म्हणजेच `आरएसएस` हे नाव द्यावं अशी सूचना दिली आहे.

भारतीय रेल्वे - सर्वांत मोठं 'उघड्यावरील शौचालय'!

Last Updated: Friday, July 27, 2012, 20:29

देशाची लाईफ लाईन आसलेली रेल्वे ही जगातील सर्वात मोठं उघड्यावरील शौचालय आसल्याची जोरदार टीका केंद्रिय ग्रामीण विकास मंत्री जयराम रमेश यंनी केली. जयराम रमेश यांनीही हे वक्तव्य जैव शौचालयास निधी मिळवण्यासंबंधी केली.