Last Updated: Saturday, July 28, 2012, 16:41
www.24taas.com, आझमगडउत्तरप्रदेशात बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा मायावती यांच्या पुतळ्याच्या तोडफोडीचं प्रकरण शांत होतं ना होतं तोच आता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचीही तोडफोड करण्यात आलीय.
आझमगड जिल्हातील तीन वेगवेगळ्या गावांत भारतीय घटनेचे शिल्पकार आणि बसपाचे प्रणेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आलीय. या घटनेचा निषेध करत बसपा कार्यकर्त्यांनी तब्बल चार तास रास्ता रोको केला.
पोलीसांकडून मिळेलेल्या माहितीनुसार मेहनगरमधील ‘कटात-चककटात’ या गावात काल रात्री उशिरा ही घटना घडली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा काही भाग तोडून शेतामध्ये फेकण्यात आला होता. जियासाठ गावांमध्यही अशाच प्रकारे डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याची तोडफोड केल्यानं तेथील ग्रामस्थांनी संताप व्यक्त केलाय.
सूत्रांच्या माहितीनुसार घडलेल्या घटनेचा ग्रामस्थांनी आणि बसपा कार्यकर्त्यांनी निषेद्ध व्यक्त करत गावातील मुख्य मार्गावर तब्बल चार तास रास्ता रोको केला. घटनास्थळी पोहचलेल्या अधिकाऱ्यांनी नवीन पुतळा बसवून संबंधितांवर कडक कारवाई करण्याचं आश्वासन दिलं, त्यानंतर हा रास्ता रोको मागे घेण्यात आला. सदर घटनेचा पोलीस तपास करत आहेत.
.
First Published: Saturday, July 28, 2012, 16:41