Last Updated: Sunday, July 29, 2012, 18:52
www.24taas.com, नवी दिल्ली आज अण्णा हजारे जंतर मंतरवर उपोषणाला बसल्यापासून गर्दी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे गेले चार दिवस टीम अण्णांच्या उपोषणाच्या आंदोलनाची हेटाळणी करणाऱ्य़ा काँग्रेसलाही आता त्याची दखल घेणं भाग पडलं आहे.
काल पर्यंत टीम अण्णांच्या आंदोलनाबद्दल एक शब्दही न उच्चारणाऱ्या काँग्रेसच्या मंत्र्यांनी आता तोंड उघडलं आहे. केंद्रीय कायदे मंत्री सलमान खुर्शीद यांनी अण्णांच्या आव्हानाला उत्तर देताना म्हटलं आहे, “सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना आव्हान देणं म्हणजे एखाद्या महाकाय हत्तीला टक्कर देण्यासारखं आहे.”
ज्या जनलोकपालसाठी टीम अण्णा आंदोलन करत आहे, त्या जनलोकपालमुळे सर्वसामान्य माणसांनाच अधिक त्रास होणार आहे. असंही खुर्शीद म्हणाले.
First Published: Sunday, July 29, 2012, 18:52