Last Updated: Monday, July 30, 2012, 16:47
www.24taas.com, नवी दिल्ली केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शनं करण्यात आलीत. अण्णा हजारे यांच्या समर्थकांनी ही निदर्शनं केली आहे.१५ भ्रष्ट मंत्र्यांविरोधात आणि लोकपालच्या मागण्यांसाठी अण्णा हजारे आणि टीम अण्णा जंतरमंतरवर उपोषणाला बसली आहे.
या भ्रष्ट मंत्र्यांमध्ये शरद पवारांचेही नाव आहे. हे कार्यकर्ते टीम अण्णाचे नसल्याचा दावा करण्यात येतोय. मात्र, हे कार्यकर्ते अण्णांचे नव्हते असे सांगण्यात येत आहे. दरम्यान, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा आज दुसरा तर टीम अण्णाच्या उपोषणाचा सहावा दिवस आहे. अण्णांच्या उपोषणाच्या दुस-या दिवशीही जंतरमंतर गर्दीनं फुलून गेले आहे. भ्रष्टाचार आणि लोकपालच्या मुद्यावर अण्णा आणि सरकारमध्ये आरपारची लढाई सुरू झाली आहे.
लोकांनी देशासाठी एक आठवडा द्यावा, अशी विनंती अण्णांनी जनतेला केलीय. अण्णा हजारे उपोषणाला बसताच जंतरमंतरवरील हरवलेलं चैतन्य पुन्हा एकदा परतलय. अण्णांच्या आंदोलनाला समर्थन देणा-यांची संख्या वाढतच असल्याचं चित्र पाहायला मिळतय. सुरूवातीला टीम अण्णांनी उपोषण सुरू केल्यानंतर जंतरमंतरवर अण्णा समर्थकांची फारशी गर्दी नव्हती मात्र आता गर्दी वाढल्यानं या आंदोलनाचा नूर पालटलाय.
व्हि़डिओ पाहा
First Published: Monday, July 30, 2012, 16:47