Last Updated: Tuesday, July 31, 2012, 12:15
www.24taas.com, नवी दिल्ली देशात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी केंद्राच्या विशेष मंत्रिगटाची बैठक होतेय. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे.
सध्या महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, राजस्थान, पंजाब आणि हरियाणात दुष्काळाचं संकट निर्माण झालयं. दुष्काळावर उपाययोजना करण्यासाठी या बैठकीत चर्चा होणार आहे. शिवाय दुष्काळाशी सामना करण्यासाठी विशेष पावलंही उचलली जाण्याची शक्यता आहे.
यंदा देशात सरासरीपेक्षा 21 टक्के पाऊस कमी झालाय. त्यामुळं देशातल्या अनेक राज्यांतल्या खरीपांच्या पिकांवर परिणाम झालाय. शिवाय पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनलाय.
First Published: Tuesday, July 31, 2012, 12:15