महाराष्ट्राला चौथ्यांदा केंद्रीय गृहमंत्रीपद - Marathi News 24taas.com

महाराष्ट्राला चौथ्यांदा केंद्रीय गृहमंत्रीपद

www.24taas.com, नवी दिल्ली
केंद्रीय मंत्रिमंडळात अखेर फेरबदल करण्याचा निर्णय पंतप्रधानांनी घेतलाय. केंद्रीय अर्थमंत्रिपदी चिदम्बरम यांची वर्णी लागली आहे तर गृहमंत्रिपदावर सध्याचे ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे विराजमान झालेत. विरप्पा मोईलींकडे ऊर्जा मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवला गेलाय.
 
लोकसभेचं नेतेपद हा सुशीलकुमार शिंदे यांच्या कारकिर्दीतला आणखी एक बहुमान आहे. एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या शिंदेंनी मोठ्या कष्टानं शिक्षण घेतलं. कोर्टात पट्टेवाला म्हणून नोकरी केली. पुढे पोलीस खात्यातल्या नोकरीचा राजीनामा देऊन राजकारणात प्रवेश केला. तेव्हापासून आतापर्यंत त्यांनी मागे वळून पाहिलेलं नाही.
 
सुशीलकुमारांच्या रुपानं चौथ्यांदा महाराष्ट्राच्या वाट्याला केंद्रीय गृहमंत्रीपद मिळालंय. यापूर्वी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना पहिल्यांदा हा मान मिळाला त्यानंतर शंकरराव चव्हाण आणि शिवराज पाटील टाकूरकर यांनीही हे पद भूषवलं.
 

First Published: Tuesday, July 31, 2012, 23:10


comments powered by Disqus