गांधी घराणे दलितांना विसरत नाही- शिंदे

Last Updated: Wednesday, August 1, 2012, 16:58

केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आज गृहमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी देशाच्या सुरक्षेऐवजी गांधी घराणे दलितांना विसरलेले नाही, अशी स्तुतीसुमने वाहत दलित कार्ड बाहेर काढले.

महाराष्ट्राला चौथ्यांदा केंद्रीय गृहमंत्रीपद

Last Updated: Tuesday, July 31, 2012, 23:10

केंद्रीय मंत्रिमंडळात अखेर फेरबदल करण्याचा निर्णय पंतप्रधानांनी घेतलाय. केंद्रीय अर्थमंत्रिपदी चिदम्बरम यांची वर्णी लागली आहे तर गृहमंत्रिपदावर सध्याचे ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे विराजमान झालेत. विरप्पा मोईलींकडे ऊर्जा मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवला गेलाय.

मंत्रिमंडळातील फेरबदल मंजुरीसाठी प्रणवदांकडे...

Last Updated: Tuesday, July 31, 2012, 17:58

केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल अखेर फेरबदल करण्याचा निर्णय पंतप्रधानांनी घेतलाय. केंद्रीय अर्थमंत्रिपदी चिदम्बरम यांची वर्णी लागणार आहे तर गृहमंत्रिपदावर सध्याचे ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे विराजमान होणार असल्याचं आता नक्की झालंय. मंत्रिमंडळातील बदल मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे धाडण्यात आल्याची, माहिती सूत्रांकडून मिळतेय. विरप्पा मोईलींकडे ऊर्जा मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवला जाणार आहे.

सुशीलकुमार होणार देशाचे गृहमंत्री?

Last Updated: Tuesday, July 31, 2012, 12:34

संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होण्याचे संकेत पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दिले आहेत. केंद्रीय अर्थमंत्रिपदी चिदम्बरम यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.