Last Updated: Wednesday, August 1, 2012, 16:58
www.24taas.com, नवी दिल्ली 
केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आज मंत्रीपदाचा पदभार स्वीकारताच. गांधी घराण्याला धन्यवाद देऊन टाकले आहेत. त्यांनी देशाच्या सुरक्षेऐवजी गांधी घराणे दलितांना विसरलेले नाही, अशी स्तुतीसुमने वाहत दलित कार्ड बाहेर काढले. आणि पुन्हा एकदा आपण गांधी घराण्याशी किती एकनिष्ठ आहोत हे दाखवून दिलं आहे.
निम्मा देश अंधारात असताना त्यांनी ब्लॅक आऊट विषयाला बगल देत सोनिया गांधी व मनमोहनसिंग यांची तारीफ केली. ते म्हणाले, गृहमंत्रालयासारखे खाते दलितांना दिले जात नाही, असा आजपर्यंतचा अनुभव आहे. पण राजीव गांधी पहिले पंतप्रधान ठरले होते ज्यांनी देशाला पहिला दलित गृहमंत्री देताना बूटा सिंग यांना संधी दिली होती.
देशाच्या इतिहासात आता दुसऱ्यांदा सोनिया गांधी यांच्यामुळेच माझ्यासारख्या दलिताला संधी देण्यात आली. गृहमंत्रालय हे आव्हानात्मक व अडचणीचे मंत्रालय असते.
First Published: Wednesday, August 1, 2012, 16:58