माजी सरसंघचालक के.एस. सुदर्शन अखेर सापडले - Marathi News 24taas.com

माजी सरसंघचालक के.एस. सुदर्शन अखेर सापडले

www.24taas.com, म्हैसूर
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरसंघचालक के. एस. सुदर्शन हे आज पहाटे पाच वाजल्यापासून बेपत्ता झाले होते.  पहाटे 'मॉर्निंग वॉक'साठी बाहेर पडलेले सुदर्शन सहा तास बेपत्ता होते. अखेर ते सहा तासानंतर घरापासून दोन किलोमीटर अंतरावर सापडले आहेत.
 
सुदर्शन आपल्या नातेवाईकांकडे थांबले आहेत. बराच वेळ झाला तरी ते घरी न आल्याने त्यांच्या नातेवाईकांनी पोलिसात हरविल्याची तक्रार दाखल केली होती. म्हैसूर पोलिसांनी त्यांचा कसून शोध घेताच त्यांचा तपास लागला.
म्हैसूरमधील सिद्धार्थनगर येथे सुदर्शन यांचे भाऊ राहतात. सध्या ते त्यांच्याकडे आले आहेत. पहाटे पाच वाजता फिरायला म्हणून घराबाहेर पडल्यानंतर चार तास झाले तरी ते घरी न आल्याने त्यांच्या बंधूंनी तक्रार दाखल केली. सुदर्शन त्या परिसरात नविन असल्याने रस्ता चुकले तर नाहीत ना, अशी शंका पोलिसांनी व्यक्त केली होती. त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली व अवघ्या दोन तासातच सुदर्शन त्यांच्या बंधूंच्या घरापासून दोन किलोमीटरवर अंतरावर सापडले.

First Published: Friday, August 3, 2012, 12:56


comments powered by Disqus