Last Updated: Sunday, August 5, 2012, 13:12
www.24taas.com, नवी दिल्ली 
नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाबद्दल आतापासूनच वादविवादाच्या फैरी झडू लागल्या आहेत. भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी आणि नितीश कुमार यांची २५ जुलैला एक गुप्त बैठक झाली. या बैठकीत नितीश कुमारांनी मोदींच्या नावाला तीव्र विरोध केला. नितीन गडकरींनीही पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर करण्याआधी एनडीएच्या सर्व घटक पक्षांशी चर्चा करू असं आश्वासन दिलं आहे.
२०१४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी एनडीएचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून समोर येणार नाहीत, असं आश्वासनच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपकडे मागितली आहे. त्यामुळे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनंतर भाजप आणि जनता दल (संयुक्त) यांच्यातील संबंध ताणले गेल्याचे स्पष्ट संकेत मिळू लागले आहेत.
नितीश कुमारांनी देशाचा पंतप्रधान धर्मनिरपेक्ष असावा असं म्हणत मोदींना याआधीच अप्रत्यक्ष विरोध केला आहे. त्याचाच पुढचा भाग म्हणून नितीश कुमारांनी गडकरींकडे ही खात्री मागितल्याची चर्चा आहे
First Published: Sunday, August 5, 2012, 13:12