Last Updated: Thursday, December 22, 2011, 19:45

झी २४ तास वेब टीम, मुंबई
अण्णा हजारे उपोषणासाठी मुंबईत बसू शकणार आहेत. उपोषणासाठी MMRDA च्या मैदानाची परावनगी मिळाली आहे. बीकेसीतील मैदानाची 13 दिवसांसाठी परवानगी मिळाली आहे. अण्णांनी काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये उपोषण करण्याची परवानगी मागितली होती. त्यावर उपोषणासाठी एमएमआरडीएच्या मैदानाची परवानगी अण्णांना मिळाली आहे. 27 डिसेंबरपर्यंत सरकारनं संसदेत लोकपाल विधेयक न आणल्यास आंदोलनाचा इशारा अण्णांनी दिलाय. तोपर्यंत लोकपालवर कुठलाही निर्णय न झाल्यास मुंबईत अण्णांचं उपोषण होण्याची शक्यता आहे.
दिवाळीच्या कडाक्याची थंडी टाळण्यासाठी टीम अण्णा यांनी हा निर्णय घेतला आहे. दिल्लीत रामलीला मैदानावर अण्णांनी केलेल्या उपोषणाला देश आणि परदेशातूनही प्रचंड पाठिंबा लाभला होता. जनलोकपालची लढाई लढणाऱ्या अण्णांच्या उपोषणाची आणि आंदोलनाची दखल देशातल्याच नव्हे तर अमेरिकेतील टाईम सारख्या मासिकानेही घेतली. जगभरातल्या भारतीयांनी सोशल नेटवर्किंग साईटच्या माध्यमातून या आंदोलनाला भरघोस पाठिंबा दिला होता. तसेच देशातल्या तरुणाईलाही अण्णांच्या आंदोलनाने सहभागी करुन घेतलं.
First Published: Thursday, December 22, 2011, 19:45