Last Updated: Sunday, December 25, 2011, 15:05
झी २४ तास वेब टीम 
पेट्रोलच्या किंमती हा गेल्या काही दिवसापासून चिंतेचा विषय बनत चाललं आहे. पेट्रोलचे दर आता पुन्हा एकदा वाढणार आहे, पेट्रोलचे दर जवळजवळ १ रूपयाने वाढणार असल्याने आता या पेट्रोलच्या दराचा पुन्हा एकदा भडका उडाला आहे.
पेट्रोलच्या किंमती पुन्हा एक रुपयानं वाढण्याची शक्यता आहे. लिटरमागं एक रुपया वाढवण्याची तयारी पेट्रोल कंपन्यांनी केली आहे. पुढील महिन्यात ही पेट्रोल दरवाढ होण्याची शक्य़ता वर्तवण्यात येते आहे.
डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या होणाऱ्या घसरणीमुळं पेट्रोलमध्ये भाववाढ होण्याची शक्यता आहे. मात्र डिझेलचे भाव वाढवण्याचा सरकारचा विचार नाही. महागाई रोखण्यासाठी डिझेलवर नियंत्रण ठेवण्याचा सरकारचा विचार आहे.
First Published: Sunday, December 25, 2011, 15:05