पेट्रोल पाच रूपयांनी महागण्याची शक्यता

Last Updated: Tuesday, March 6, 2012, 19:25

निवडणुका संपताच आता महागाईचे चटके बसण्याची चिन्हं आहेत. पेट्रोलमध्ये पाच रुपये वाढ करण्याची मागणी पेट्रोल कंपन्यांनी केली आहे. पेट्रोलमध्ये दरवाढ केली जावी यासाठी सातत्याने पेट्रोल कंपन्या मागण्या करीत आहेत.

नव्या वर्षाची भेट, पेट्रोल वाढ २ रूपयाने थेट?

Last Updated: Monday, January 2, 2012, 08:52

नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच आम आदमीला पुन्हा महागाईचा सामना करावा लागणार आहे. पेट्रोलचे दर सव्वा दोन रुपयांनी महागण्याची शक्यता आहे. सध्या रुपयाच्या होणाऱ्या घसरणीमुळे पुन्हा एकदा पेट्रोल दरवाढीचा बोजा पडणार आहे. देशातल्या इंधन कंपन्यांची यासंदर्भात आज बैठक होण्याची शक्यता आहे.

वाढता वाढता वाढे पेट्रोलचे दर ?

Last Updated: Sunday, December 25, 2011, 15:05

पेट्रोलच्या किंमती हा गेल्या काही दिवसापासून चिंतेचा विषय बनत चाललं आहे. पेट्रोलचे दर आता पुन्हा एकदा वाढणार आहे, पेट्रोलचे दर जवळजवळ १ रूपयाने वाढणार असल्याने आता या पेट्रोलच्या दराचा पुन्हा एकदा भडका उडाला आहे.