Last Updated: Tuesday, December 27, 2011, 21:39
झी २४ तास वेब टीम, नवी दिल्लीमला नाही वाटतं की माझ्या देशाचे पंतप्रधान लोकपालाच्या कक्षेत यावे, शिवसेनेच्या मताशी आपण सहमत असल्याचं मत खासदार सुप्रिया सुळे यांनी आज संसदेत लोकपालवरील चर्चेदरम्यान व्यक्त केले. कदाचित माझ्या पक्षाला माझी भूमिका मान्य नसेल, पण पंतप्रधानपद लोकपाल कक्षेच्या बाहेर असावं असं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय.
खासदार सुप्रिया सुळे यांच्या आधी संसदेत शिवसेना खासदार अनंत गीते यांनी पंतप्रधानपद लोकपालाच्या कार्यकक्षेत आणू नये असं म्हटलं होतं.
राजकारण्यांनी लोकशाही पद्धतीने आपसातील मतभेद संपवून लोकांसमोर आपली प्रतिमा सुधारली पाहिजे, असेही सुळे यांनी यावेळी सांगितले.
लोकपाल हा भ्रष्टाचाराविरोधात लढण्याचं पहिलं पाऊल आहे. संसदेत याबाबतीत सर्व पक्षांनी सहमती दर्शवली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
First Published: Tuesday, December 27, 2011, 21:39