Last Updated: Saturday, December 31, 2011, 17:23
झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली मुंबईत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जागा देण्यास पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी तत्वतः मान्यता दिली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वारीज चव्हाण यांनी आज येथे दिली.
मुख्यमंत्री चव्हाण यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार व गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी आज पंतप्रधानांची भेट घेतली. पंतप्रधानांशी झालेल्या बैठकीदरम्यान इंदू मिल आणि बेळगाव प्रश्नावर चर्चा झाली. यावेळी झालेल्या बैठकीत इंदू मिलबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री चव्हाण यांनी सांगितले.
डॉ. आंबेडकर स्मारकाबाबत आजच एक समिती नेमण्यात येणार आहे. या समितीमध्ये केंद्र आणि राज्यातल्या प्रतिनिधींचा समावेश असेल. ३१ जानेवारी पर्यंत संयुक्त समिती इंदू मिलबाबत निर्णय घेणार आहे, असे चव्हाण यांनी यावेळी सांगितले.
First Published: Saturday, December 31, 2011, 17:23