हरियाणात स्कूलबसला अपघात ९ विद्यार्थी ठार - Marathi News 24taas.com

हरियाणात स्कूलबसला अपघात ९ विद्यार्थी ठार

झी २४ तास वेब टीम, हरियाणा
 
आज सकाळी हरियाणामध्ये अंबाला येथील गुरू अर्जुनदेव पब्लिक स्कुलच्या स्कूल बसला अपघात झाला आहे. स्कूल बस आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला, हा अपघात रस्त्यावर असणाऱ्या दाट धुक्यामुळे झाला आहे. त्यात ९ विद्यार्थ्यी ठार झाले आहेत, त्यात ड्रायव्हरचा देखील समावेश आहे. तर अनेक विद्यार्थी हे जखमी झाले आहेत.
 
हरियाणामध्ये स्कूल बसला झालेल्या अपघातात ७ विद्यार्थी ठार तर वीस विद्यार्थी जखमी झाले आहेत. अंबालामध्ये दाट धुक्यामुळे हा अपघात झाला आहे. या स्कूलबसमध्ये खचाखच विद्यार्थी भरले होते. सहा-शहाबाद रस्त्यावरुन सकाळी ही बस जात असताना तिची टक्कर एका ट्रकशी झाली.
 
या अपघातात ९ विद्यार्थी ठार झाल्याचे समजते तर अनेक गंभीर जखमी आहेत. अर्जुन पब्लिक स्कूलचे हे सगळे विद्यार्थी पाच ते आठ वर्षांचे आहेत. सध्या घटनास्थळी बचावकार्य वेगानं सुरू आहे.

First Published: Monday, January 2, 2012, 13:53


comments powered by Disqus