विद्यार्थ्यांना स्वच्छतागृह सफाईची शिक्षा - Marathi News 24taas.com

विद्यार्थ्यांना स्वच्छतागृह सफाईची शिक्षा

www.24taas.com, ओरिसा
 
ओरिसा येथील केंद्रपारा जिल्ह्यातील सरकारी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना जबरदस्तीने स्वच्छतागृहांची सफाई करण्यास भाग पाडले. पट्टमुंडाई पोलिस चौकीच्या हद्दीत हा धक्कादायक प्रकार घडला.
 
जिल्हा स्तरावरीलवरील शाळांचे परिनिरीक्षक आलेख चंद्र प्रुस्टी म्हणाले, “या संदर्भात शाळेच्या उप निरीक्षकांना चौकशीचे आदेश दिलेले आहेत. यात शाळेचे अधिकारी दोषी आढळल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल.”
 
कोलाथिया प्रोजेक्ट प्राथमिक शाळेच्या तिसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या एका ग्रुपला वर्गात गोंगाट केल्याची शिक्षा म्हणून स्वच्छतागृहं साफ करायला लावली, असा विद्यार्थ्यांच्या पालकांनी आरोप केला आहे. ‘शाळा आणि शिक्षण विभागा’नेही या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
 
 

First Published: Tuesday, January 10, 2012, 18:17


comments powered by Disqus