राज ठाकरेंवर कारवाई झाली पाहिजे - नितीश कुमार - Marathi News 24taas.com

राज ठाकरेंवर कारवाई झाली पाहिजे - नितीश कुमार

 www.24taas.com, पटना
 
महाराष्ट्र  नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी युपी, बिहारमधील लोकांवर परप्रांतियांच्या विषयावरून टीका केल्याने बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज ठाकरे यांना चांगलेच खडे बोल सुनावले आहेत. महाराष्ट्रात होणाऱ्या निवडणुकां यामुळे अशा प्रकारची प्रक्षोभक भाषण केले जात आहे.
 
पटना येथील विमानतळावर नितीश कुमार यांनी राज ठाकरे  यांचा भाषणांचा समाचार घेतला, तसंच निवडणुकीत काँग्रेसला शह देण्यासाठी राज ठाकरे यांनी परप्रांतियांचा वाद उकरून काढला आहे.  अशा देशविरोधी भाष्य करणाऱ्या राज ठाकरे यांचावर सक्त कारवाई झाली पाहिजे अशी मागणी नितीश कुमार यांनी केली आहे. नितीश कुमार  यांनी म्हटलं आहे की राज ठाकरे यांनी उत्तर भारतींयाविरोधात पुन्हा एकदा गरळ ओकण्यास सुरवात केली आहे. भारतातील प्रत्येक नागरिकांला नोकरी, धंद्यासाठी देशातील कोणत्याही भागात जाण्याचे स्वातंत्र्य आहे. तसचं राज ठाकरे यांच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे, पण महाराष्ट्रातील काँग्रेसचं सरकार मुद्दामहून कोणतीच कारवाई करत नाही.
 
राज ठाकरे यांनी ९ जानेवारीला विलेपार्लेला 'मॅजेस्टिक गप्पा' या कार्यक्रमात मुलाखतीच्या दरम्यान उत्तर भारतीयांना टीकेचे लक्ष केलं होतं. '२००० मैलावरून येणाऱ्या या लोकांनी महाराष्ट्रात येऊन माज करायचा नाही, तर महाराष्ट्रात मराठी माणसांना प्राथमिकता दिली गेली पाहिजे'. राज ठाकरे यांनी म्हटलं की कोणत्याही राज्याविरोधात, भाषेविरोधात नाही मात्र मराठी माणसाचे हित हे जपलं गेलं पाहिजेच महाराष्ट्रात मराठी माणसाची कदर ही राखली गेली पाहिजेच.
 

First Published: Thursday, January 12, 2012, 12:29


comments powered by Disqus