आज जळगावात धडकणार राज; कार्यकर्त्यांची धावपळ

Last Updated: Saturday, April 6, 2013, 10:35

राज ठाकरेंची ७ एप्रिलला जळगावामध्ये जाहीर सभा होणार आहे. यासाठी मनसे कार्यकर्ते जय्यत तयारीला लागले आहेत. तर राज ठाकरे त्या सभेसाठी आजच जळगावात दाखल होणार आहेत.

राज ठाकरे वामनराव यांच्या कुटुंबांच्या भेटीला

Last Updated: Monday, June 4, 2012, 09:47

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सदगुरू वामनराव पै यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. निरुपणकार वामनराव पै यांचं नुकतच निधन झालं. त्यादरम्यान राज ठाकरे ताडोबा दौऱ्यावर होते. मात्र, ताडोबा दौऱ्यावरून मुंबई परततताच त्यांनी वामनराव पै यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केलं.

'राज ठाकरे परदेशात जातात त्याचं काय'?

Last Updated: Thursday, May 3, 2012, 17:38

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आमदारांच्या परदेश दौऱ्याला विरोध केल्यानं राजकारणही तापलं आहे. राज स्वतः परदेशात जात नाहीत काय असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी केला आहे.

... तर मंत्र्यांना जिल्हाबंदी करा- राज ठाकरे

Last Updated: Wednesday, May 2, 2012, 17:24

'महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडलेला असताना आपले मंत्री परदेशी दौरे करण्यात मग्न आहेत'. 'अशा मंत्र्यांना आपल्या जिल्ह्यात येऊ देऊ नका', 'जिल्हाबंदी करा अशा मंत्र्यांना'.

राजच्या निर्णयानंतर सेनेचा सावध पवित्रा

Last Updated: Friday, March 30, 2012, 14:32

ठाण्याच्या स्थायी समिती अध्यक्षपदाचा उमेदवार अजून ठरलेला नाही, असं सांगत शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंनी याप्रकरणी मनसेचा पर्याय खुला असल्याचे संकेत दिलेत. स्थानिक पातळीवर हे प्रश्न सुटायला हवेत हे सांगतानाच मनसे याप्रकरणी राजकारण करत असल्याची टीकाही त्यांनी केली.

सेनाप्रमुखांचे राज ठाकरेंना चोख प्रत्युत्तर

Last Updated: Monday, January 23, 2012, 21:32

बाळासाहेबांनी राज ठाकरेंना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. राज ठाकरेंकडे शिवसेनेचं मन ओळखण्याचं यंत्र आहे का, असा प्रश्न त्यांनी राजना केला.

राज ठाकरेंचा परत एकदा शिवसेनेवर हल्लाबोल

Last Updated: Monday, January 23, 2012, 09:04

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शिवसेनेवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. मनाने हरल्यानेच शिवसेना फोडाफोडीचं राजकारण करत असल्याचं सांगत त्यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे. माणूस आतून लढाई हरला की, भलतेसलते उद्योग करायला लागतो.

बाळासाहेब ठाकरे उतरणार मैदानात

Last Updated: Friday, January 13, 2012, 17:09

निवडणुकीत स्टार प्रचारक उतरण्यावर भरही दिला जात आहे. मनसेने राज ठाकरेंच्या 'होम मिनिस्टर'ना मैदानात उतरविले आहे. आता तर शिवसेनेने ठाणे, मुंबईत सत्ता राखण्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मैदानात आणण्याचे ठरविले आहे.

राज ठाकरेंवर कारवाई झाली पाहिजे - नितीश कुमार

Last Updated: Thursday, January 12, 2012, 12:29

महाराष्ठ्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी युपी, बिहारमधील लोकांवर परप्रांतियांच्या विषयावरून टीका केल्याने बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज ठाकरे यांना चांगलेच खडे बोल सुनावले आहेत. महाराष्ट्रात होणाऱ्या निवडणुकां यामुळे अशा प्रकारची प्रक्षोभक भाषण केले जात आहे.

राज ठाकरेंवर उद्धव यांचे तोंडसुख

Last Updated: Wednesday, January 11, 2012, 11:37

मुंबईत बंडखोरीचं निशाण नको, असं भावनिक आवाहन शिवसैनिकांना करत, शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी गटनेत्यांच्या मेळाव्यात मुंबई महापालिका निवडणुकांचं रणशिंग फुकलं. त्याचवेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर तोंडसुख घेतले.

राज यांनी दिला मुंबई हायकोर्टालाच सल्ला

Last Updated: Tuesday, January 3, 2012, 11:18

मी प्रत्येक वेळी मराठीच्या मुद्यावर बोलतं आलो पण मला चुकीचं ठरवत माझ्यावर टीका केली गेली आता गुजरात हायकोर्टाने जो निर्णय दिला आहे त्यांच्याकडून मुंबई हायकोर्टाने काहीतरी शिकावे असा सल्ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्य़क्ष राज ठाकरे यांनी चक्क मुंबई हायकोर्टाला दिला आहे. राज ठाकरे औरंगाबादमध्ये बोलत होते.

राज ठाकरे - सरसंघचालक यांची भेट

Last Updated: Friday, December 30, 2011, 17:30

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांची सदिच्छा भेट घेतली.

राज यांचे विधान म्हणजे ब्रह्म वाक्य नव्हे- उद्धव

Last Updated: Thursday, December 22, 2011, 20:05

उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. राज ठाकरेंचे विधान म्हणजे ब्रह्म वाक्य नव्हे. शिवसेना सीमावासियांना वाऱ्यावर सोडणार नाही. राज यांची भूमिका म्हणजे सीमावासियांची क्रूर थट्टा असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. सीमावासियांनी राज ठाकरेंची भेट घेतली तेंव्हा मराठी माणसाला मान सन्मान मिळत असेल तर कर्नाटकात राहयला काय हरकत आहे असं वक्तव्य राज ठाकरेंनी केलं होते.

भटके मतदार कसे - राज ठाकरे

Last Updated: Friday, December 2, 2011, 08:11

मुंबईतील भटके मतदार कसे होऊ शकतात. त्यांची नावे मतदार यादीत नकोत, असे राज ठाकरेंनी निवडणूक अधिकाऱ्यांना सांगताच आपल्या मागणीचा विचार केला जाईल, असे आश्वासन निवडणूक अधिकाऱ्यांनी दिले.

खा.परांजपेंची राज ठाकरेंनी केली कोंडी

Last Updated: Wednesday, November 23, 2011, 06:06

शिवसेनेचे खासदार आनंद परांजपे मनसेत यायला उत्सुक होते, या मनसे आमदार राम कदम यांच्या गौप्यस्फोटाला राज ठाकरेंनीही दुजोरा दिलाय.

राज ठाकरेंची बोचरी टिका

Last Updated: Tuesday, November 22, 2011, 15:43

शरद पवारांचे सासरे अजित पवारांचे आजोबा कसे काय होऊ शकतात अशी खास राज ठाकरे शैलीतली टिका राज ठाकरेंनी केली. शरद पवारांचे सासरे रणजी क्रिकेटपटू होते आणि ते आपले आजोबा होते असं विधान अजित पवारांनी केलं होतं.

परप्रांतियांना सत्ताधारी गोंजारत आहेत - राज

Last Updated: Monday, November 21, 2011, 03:05

कापूस उत्पादक शेतकरी तडफडतो आहे. परप्रांतियांना तुम्ही गोंजारता. मराठी माणूस प्रश्नांसाठी रस्त्यावर आला की काठय़ा मारता, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुणे येथे केली.

राज ठाकरे यांची दिवाळीनंतर ‘फटाकेबाजी’!

Last Updated: Thursday, November 3, 2011, 13:49

काही फटाके दिवाळीनंतरही बाकी ठेवायचे असतात, असे सांगत दिवाळीला भाष्य करणं राज ठाकरेंनी टाळलं होतं. मात्र, आज आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन संजय निरूपम, कृपाशंकर सिंह, उद्धव ठाकरे, उत्तर भारतीय, हिंदी मीडियांचा चांगलाच समाचार घेतला.

राज यांचा पत्रकारितेचा क्लास, पाहा झी २४ तास

Last Updated: Thursday, October 27, 2011, 11:26

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी यांनी झी २४ तासच्या सर्व विभागांना भेट देत तिथे चालणाऱ्या कामकाजाची माहिती जाणून घेतली. प्रत्येक विभागाचे काम कसे चालते, त्यांच्या जबाबदाऱ्या काय असतात या संबंधीच्या तपशीलात त्यांना रस होता.

श्री. राज ठाकरे - गेस्ट एडिटर, झी 24 तास

Last Updated: Thursday, October 27, 2011, 11:25

महाराष्ट्र नवनिर्मण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंचे दिवाळी भेटी निमित्त झी २४ तासच्या कार्यालयात आगमन झाले. राज ठाकरेंच्या भेटीने कार्यालयातील नूरच पालटून गेला. झी २४ तासच्या कर्मचारी वृदांमध्ये राज ठाकरेंच्या भेटीने उत्साहाचे आणि उल्हासाचे वातावरण तयार झाले.

महाराष्ट्राचे ग्रह फिरले आहेत!

Last Updated: Sunday, October 9, 2011, 12:17

राज्यकर्त्यांची इच्छाशक्ती आणि त्यास प्रशासनाची साथ असल्यास राज्यात काय होऊ शकते याचे गुजरात हे आदर्श उदाहरण ठरावे , असे राज म्हणाले