चप्पल फेक भोवली, नोकरी गमावली - Marathi News 24taas.com

चप्पल फेक भोवली, नोकरी गमावली

झी २४ तास वेब टीम, लखनऊ
 
समाजसेवक अण्णा हजारे यांचे प्रमुख सहकारी अरविंद केजरीवाल यांच्यावर चप्पल फेकणा-या जितेंद्र पाठक नावाच्या तरूणाला कामावरून काढून टाकण्यात आले आहे.
 
लखनऊ येथील एका खासगी कन्स्ट्रक्शन कंपनीत कामाला असलेल्या जितेंद्रला या घटनेनंतर नोकरी कमी करण्यात आले आहे. लखनऊ येथील अंश प्रोजेक्ट सर्विसेसचे अध्यक्ष रवींद्र सिंह यांनी स्पष्ट केले की, जितेंद्र त्यांच्या कंपनीत सुपरवायझर पदावर काम करत होता.
 
काही महिन्यांपूर्वीच त्याला ही नोकरी मिळाली होती. कंपनीत तरी त्याने अद्याप कुणाशीही गैरवर्तन केलेले नाही, परंतु केजरीवाल यांच्याबाबतीत त्याचे वर्तन बुचकळ्यात टाकणारे आहे, अशा हिंसक प्रवृत्तीच्या माणसाला कामावर ठेवता येणार नाही, असे सिंह यांनी सांगितले.

First Published: Saturday, November 5, 2011, 13:25


comments powered by Disqus