अबू सालेमचे होणार तरी काय? - Marathi News 24taas.com

अबू सालेमचे होणार तरी काय?

www.24taas.com
 
 
गैंगस्टर अबू सालेमचं प्रत्यार्पण रद्द होण्याची शक्यता आहे. भारतानं प्रत्यार्पण कराराचं पालन केलं नसल्यामुळे अबू सालेमचं प्रत्यार्पण रद्द करावं, असा निर्णय पोर्तुगालच्या लोअर कोर्टानं दिला होता.
 
या निर्णयाविरोधात सीबीआयनं पोर्तुगालच्या सुप्रीम कोर्टात अपील केलं होतं. पण सुप्रीम कोर्टानं CBI ची ही याचिका फेटाळून लावल्यानं, अबू सालेमचं प्रत्यार्पण रद्द होण्याची शक्यता आहे. आता सीबीआई पोर्तुगाल सुप्रिम कोर्टाच्या या निर्णयाविरोधात संविधानिक न्यायालयात अपील करणार आहे.
 
पोर्तुगालने भारताला अश्या अटीवर अबू सालेमला भारताकडे सुपूर्त केले होते की, त्याच्यावर अश्या गुन्ह्यांवर केस नाही चालवायच्या ज्यामुळे त्याला मृत्युदंड होण्याची शक्यता आहे. पण भारतात त्याविरूद्घ अश्या केसेस सुरू आहेत. ज्यामध्ये त्याला मृत्यूदंडाची शिक्षा होऊ शकते. CBI आता पोर्तुगालच्या सुप्रीम कोर्टाविरूद्ध तेथील संवेधानिक खंडपीठात अपील करणार आहे.
 

First Published: Tuesday, January 17, 2012, 20:05


comments powered by Disqus