Last Updated: Sunday, October 23, 2011, 09:44
झी २४ तास वेब टीम, नवी दिल्लीदिवेसेंदिवस नव्या संकटांना सामोरं जात असणाऱ्या टीम अण्णांवर आता स्वामी अग्निवेश यांनी हल्लाबोल केला आहे. दिल्लीत झालेल्या आंदोलनाच्या खर्चात मोठी फेरफार झाली असल्याचा दावा त्यांनी केला असून, टीम अण्णांनी आंदोलनाचा खर्च दाखवावा असे अव्हान त्यांनी दिले आहे. दिल्लीत केलेलल्या आंदोलनातला बराच पैसा अरविंद केजरीवाल यांच्या ट्रस्टकडे वळवला असल्याचा आरोपही स्वामी अग्निवेश यांनी केला.
अण्णांचे एकेकाळचे सहकारी आणि त्यांच्या आंदोलनात सक्रीय सहभाग नोंदवणारे स्वामी अग्निवेशयांचे असे म्हणणे आहे की, दिल्लीतील रामलीला मैदानावर झालेल्या आंदोलनाचा सर्व खर्च टीम अण्णांनी लोकांसमोर ठेवावा. अण्णांच्या आंदोलनासाठी सामान्य जनतेकडून मोठ्या प्रमाणात डोनेशन घेण्यात आली होती आंदोलनानंतर हा सर्व पैसा केजरीवाल यांच्या ट्रस्टकडे वळवल्याचा आरोप स्वामी अग्निवेश यांनी केला आहे. जवळपास ७० ते ८०लाख रुपये अरविंद केजरीवाल यांच्या 'इंडिया अगेन्स्ट करप्शन' या संस्थेच्या खात्यात जमा करण्यात आल्याचा आरोप स्वामी अग्निवेश यांनी केला आहे. केजरीवालांच्या या संस्थेचे अण्णा हजारे सहकारी नाहीत तर संतोष हेगडे आणि इतर लोकही या टीमचे सदस्य नाहीत तर असे असूनही पैसा या संस्थेकडे कसा वळवला असा सवाल स्वामी अग्निवेश यांनी केला आहे. अण्णांनीही या पैशांचं ऑडिट करायला सांगितल असूनही केजरीवाल यांनी ऑडिट केलं नसल्याचं स्वामी अग्निवेश यांचं म्हणणं आहे. मी कुणावरही आरोप करीत नाही, तर टीम अण्णांच्या कामात पारदर्शकता असावी म्हणून ऑडिट करण्यात यावं अशी मागणी करतोय असंही स्वामी अग्निवेश यांनी स्पष्ट केलं.
स्वामी अग्निवेश हे स्वतःही दिल्लीत झालेल्या आंदोलनाच्यावेळी टीम अण्णाचे एक सदस्य होते. मात्र, काही काळातच स्वामी अग्निवेश रामलीलावरून दिसेनासे झाले. त्यानंतर एकदा फोनवरील संभाषणामध्ये टीम अण्णातील आक्रमक सदस्यांना ‘ पागल हाथी ’ म्हटले होते. त्यानंतर टीम अण्णांमधून 'फुटलेल्या' स्वामी अग्निवेश यांनी आपली अण्णांविषयी माझी काहीही तक्रार नाही. मात्र त्यांचे निवडक सहकारी अवास्तव आक्रमक होत असल्यामुळेच मी त्यांच्यापासून दूर गेलो, असे विधान केले होते.
First Published: Sunday, October 23, 2011, 09:44