टीम अण्णांचे प्रचार अभियान सुरू - Marathi News 24taas.com

टीम अण्णांचे प्रचार अभियान सुरू


www.24taas.com , डेहराडून
 
टीम अण्णा पाच राज्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार अभियानात उतरली आहे. आजपासून प्रचार अभियान सुरू केले आहे. या अभियानाचा काय प्रभाव दिसून येतो याकडे लक्ष लागले आहे.
 
टीम अण्णा कोणा एका राजकीय पक्षाविरोधात आता प्रचार करणार नाही. पाच राज्यांमध्ये टीम अण्णांमधील अरविंद केजरीवाल, किरण बेदी, कुमार विश्वास प्रचार दौऱ्यात सहभागी होणार आहेत.  भ्रष्ट्राराचा नायनाट होण्यासाठी एक मजबुत लोकपाल आणण्यासाठी जनजागृतीबरोबर लोकपालला पाठिंबा देणाऱ्याला निवडून द्या, असे आवाहन टीम अण्णा करणार आहे.
 
निवडणूक प्रचाराला उत्तरांचल राज्यातील हरिव्दार येथून आजपासून सुरूवात झाली आहे. प्राचारा दरम्यान, जात, धर्म याही मुद्दांचा समावेश असणार आहे. प्रमुख मुद्दा असणार आहे तो, मजबूत लोकपाल देण्याचा. टीम अण्णा डेहराडून, रुद्रपूर, अल्मोड़ा आणि हल्द्वानी या भागांचा दौरा करणार आहे. दरम्यान, अण्णा हजारे या प्रचार दौऱ्यात सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
 
या प्रचार दौऱ्यात कॉंग्रेसविरोधी मुद्दा असणार आहे. लोकपालबाबत संपूर्ण देशाला कॉंग्रेसने धोका दिला आहे, असे जाहीर वक्तव्य करणार नसले तरी अभियानात याबाबत एक प्रसिद्धी पत्रक काढले जाणार आहे. ते सर्वत्र वाटले जाण्याची शक्यता आहे. तशी टीम अण्णा तयारीला लागली आहे.  या पत्रकातून राहुल गांधी, मुलायम सिंह यादव, मायावती यांनी लोकपालबाबत धोका दिला आहे, असे नमुद कऱण्यात आले आहे. या तिघांनाही टीम अण्णांनी लक्ष केलं आहे.

First Published: Saturday, January 21, 2012, 13:08


comments powered by Disqus