Last Updated: Monday, January 23, 2012, 21:32

बाळासाहेबांनी राज ठाकरेंना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. राज ठाकरेंकडे शिवसेनेचं मन ओळखण्याचं यंत्र आहे का, असा प्रश्न त्यांनी राजना केला. मनानं हरल्यामुळेच शिवसेना फोडाफोडीचं राजकारण करतेय, अशी टीका राज ठाकरेंनी केली होती. त्यावर बाळासाहेबांनी प्रत्युत्तर दिलंय.
बाळासाबहेब ठाकरेंच्या आज 85 व्या वाढदिवसानिमित्त मातोश्रीवर त्यांची रुद्राक्षतुला करण्यात आली. नेपाली मजदूर युनियनच्या वतीनं ही रुद्राक्षतुला करण्यात आली. मंत्रघोषात आणि ठाकरे कुटुंबीयांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. दरवर्षी बाळासाहेबांना शुभेच्छा देण्यासाठी अनेक शिवसैनिक मातोश्रीवर येतात. यावर्षी त्यांना या अनोख्या क्षणा3चं साक्षीदार होण्याती संधी मिळाली. या तुलेनंतर शिवसैनिकांना रुद्राक्ष वाटण्यात आले.
First Published: Monday, January 23, 2012, 21:32