प्रजासत्ताक दिनी भारत 'सशस्त्र' - Marathi News 24taas.com

प्रजासत्ताक दिनी भारत 'सशस्त्र'

www.24taas.com, नवी दिल्ली
 
भारताच्या सैन्य विभागाची क्षमता ही नेहमीच आतंरराष्ट्रीय पातळीवर कौतुकाचा विषय राहीला आहे. प्रगाढ देशप्रेम आणि सैन्यबळ यामुळे नेहमीच भारत शस्त्रसज्ज राहीला.
 
आज प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात अशाच काही नव्या क्षेपणास्त्राचा समावेश करण्यात येणार आहे. अग्नि ४  हे क्षेपणास्त्र  भारताचं एक नवं आयुध मानलं जात आहे. साधारणपणे दोन हजार किलोमीटर मारक क्षमता हे या क्षेपणास्त्राचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. २० मीटर लांब आणि १७ टन वजन अशी अग्नी ४ ची रचना आहे. एक हजार किलो विस्फोटक माऱ्य़ामुळे अग्नि ४ चर्चेचा विषय बनला आहे. नोव्हेंबर २०११ मध्ये या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली होती.
 
अग्नि-४ प्रमाणेच आजच्या संचलनात ‘प्रहार’ या क्षेपणास्त्राचेही संचलन होणार आहे. सुमारे सात मीटर लांब आणि १२८० किलो वजनाचे प्रहार क्षेपणास्त्र आहे. या क्षेपणास्त्राचे  महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे मारा केल्यावर सुमारे ३५ किलोमिटर उंचावर जाऊन सुमारे १५० किलोमीटरच्या भूपृष्ठावर जाऊन विस्फोट करते आणि हा हल्ला अवघ्या अडीचशे सेंकदांत होतो.  पृथ्वी क्षेपणास्त्रासारखी प्रहारची एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे.
 
या क्षेपणास्त्रांप्रमाणेच ‘टी-७२’ हा नाईट व्हीजन असणारा रणगाडादेखील आजचं महत्वाचं वैशिष्ट्य मानलं जात आहे. त्याचप्रमाणे ‘रुस्तम’ हे मानवरहित विमान आणि ‘निशांत’ हे नवीन बनावटीचे विमान भारतीय सैन्याची ताकद वाढवणारं ठरणार आहे.

First Published: Thursday, January 26, 2012, 18:22


comments powered by Disqus