Last Updated: Wednesday, February 1, 2012, 16:30
www.24taas.com, मुंबई तुम्हाला जर खोकला, दमा, बल्ड प्रेशर किंवा हृदयाशी संबंधित साधारण पण तरीही गंभीर आजार असतील, तर ते पळवण्यासाठी एक अत्यंत साधा सोपा घरगुती इलाज आहे. दररोज शंख वाजवा.
असं म्हटलं जातं की शंखनाद केल्याने आसपासची नकारात्मक ऊर्जा नाश पावते. तसंच सकारात्मक ऊर्जेचा शरीरात संचार होतो. शंखातून निघालेला ध्वनी जेवढ्या अंतरावर पोहोचतो, तेवढ्या परिसरातले आजार पसरवणारे किटाणु नष्ट होतात.
शंखनादाने सकारात्मक ऊर्जा उत्पन्न होते. त्यातून आत्मबल वाढतं. शंखामध्ये नैसर्गिक कॅल्शियम, गंधक आणि फॉस्फरस मोठ्या प्रमाणावर असतं. रोज शंख फुंकल्यास घशाचे आणि फुप्फुसांचे रोग होत नाहीत. शंखामुळे तोंडाच्या रोगांचा नायनाट होतो. शंख वाजवल्याने चेहरा, श्वसन यंत्रणा, श्रवण यंत्रणा आणि फुप्फुसांचा व्यायाम घडतो. याशिवाय शंखनादामुळे स्मरणशक्तीचा विकासही होतो.
First Published: Wednesday, February 1, 2012, 16:30