अझीम प्रेमजींचा 'युपीए'वर हल्लाबोल - Marathi News 24taas.com

अझीम प्रेमजींचा 'युपीए'वर हल्लाबोल

झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली
 
वेगवेगळ्या भ्रष्टाचार प्रकरणांमुळे अडचणीत आलेल्या युपीए सरकारवर विप्रोचे प्रमुख अझीम प्रेमजी यांनीही हल्ला चढवलाय.
 
सरकारी पातळीवर निर्णय घेण्याच्या क्षमतेचा असलेला संपूर्ण अभाव ही या देशाला भेडसावणारी सर्वात मोठी समस्या असल्याची टीका प्रेमजी यांनी केलीय. हा प्रकार असाच सुरू राहिला तर देशाच्या आर्थिक विकासाला मोठा फटका बसेल असा इशाराही त्यांनी दिलाय.
 
सरकारी पातळीवरील या वाढत्या अनास्थेबाबत अझीम प्रेमजी यांनी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग तसच उद्योग आणि न्यायव्यवस्थेतील लोकांना पत्र लिहलय. या पत्रांतून गेल्या काही दिवासांत उघड झालेल्या घोटाळ्यांवर त्यांनी चिंता व्यक्त केलीय.

First Published: Tuesday, November 1, 2011, 07:01


comments powered by Disqus