Last Updated: Saturday, February 18, 2012, 16:52
www.24taas.com, पणजी गोव्यातील अल्डोना येथील नदीत विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस कोसळली. या अपघात तीन जणांना जीव गमवावा लागला आहे. बसमध्ये १५ विद्यार्थ्यांसह शिक्षक होते. दोन विद्यार्थी आणि एक शिक्षका अपघातात ठार झाली. हा अपघात आज शनिवारी झाला.
नदीत कोसळलेली बस बाहेर काढण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पोलिसांनी सांगितले की, अल्डोना येथील कळवा नदीत आज सकाळच्या सुमारास शाळेची बस कोसळली. बसमध्ये १५ विद्यार्थ्यांसह शिक्षिका होत्या. या घटनेत आणखी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. बसला नदीबाहेर काढण्यासाठी पोलिसांचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
First Published: Saturday, February 18, 2012, 16:52