पुणे येथे दुरांतो एक्स्प्रेसने ट्रॅक्टर उडवला, तीन मजूरांचा मृत्यू

Last Updated: Saturday, May 3, 2014, 15:57

सिकंदराबाद दुरांतो एक्स्प्रेसने ट्रॅक्टरला दिलेल्या धडकेत तीन मजूरांचा मृत्यू झालाय तर सात मजूर गंभीर जखमी झालेत. हा अपघाता सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास झाला. क्रॉसिंगवर मजुरांना घेऊन जात असलेल्या ट्रॅक्टरला एक्स्प्रेसने धडक दिली.

खेडमध्ये इमारत कोसळून, तीन मजूर ठार

Last Updated: Tuesday, February 18, 2014, 08:37

रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये महाडनाका इथं बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळून तीन मजूर ठार झाले आहेत.

रेल्वेखाली तीन जणांचा चिरडून मृत्यू

Last Updated: Wednesday, November 27, 2013, 17:48

सांगली जिल्ह्यात मिरजजवळ आज सकाळी रेल्वे अपघातात तिघांचा मृत्यू झालाय. मृतांमध्ये दोन महिला आणि एका पुरूषाचा समावेश आहे.

रूळ ओलांडणाऱ्या तिघांना रेल्वेची धडक

Last Updated: Saturday, August 18, 2012, 20:12

मुंबईत पश्चिम रेल्वेच्या माटुंगा आणि माहिम रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रुळ ओलांडत असताना तिघांचा रेल्वेच्या धडकेने मृत्यू झाला.

विद्यार्थ्यांचा मृत्यू : बांधकाम, पालिकेला नोटीस

Last Updated: Saturday, March 17, 2012, 21:13

सांगलीतल्या स्कूलबसवर झाड कोसळून तीन विद्यार्थ्यांच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महापालिकेला नोटीस बजावलीय. झाडाच्या खबरदारीबाबत या नोटीशीतून खुलासा मागवण्यात आलाय.वनखात्याच्या सल्ल्यानंतर पुढील कारवाई होणार आहे.

सांगलीत झाड कोसळून तीन ठार

Last Updated: Thursday, March 15, 2012, 17:02

सांगली मिरज रोडवर आज इंजिनिअरिंग कॉलेडच्या बसवर झाड कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात आष्टा येथील अण्णासाहेब डांगे इंजिनिअरिंग कॉलेजचे तीन जण ठार तर पाच जण गंभीर जखमी झालेत.

गोव्यात बस नदीत कोसळली, तीन ठार

Last Updated: Saturday, February 18, 2012, 16:52

गोव्यातील अल्डोना येथील नदीत विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस कोसळली. या अपघात तीन जणांना जीव गमवावा लागला आहे. बसमध्ये १५ विद्यार्थ्यांसह शिक्षक होते. दोन विद्यार्थी आणि एक शिक्षका अपघातात ठार झाली. हा अपघात आज शनिवारी झाला.

नाशिक अपघातात तीन ठार

Last Updated: Saturday, February 11, 2012, 17:42

साईदर्शनासाठी शिर्डीला जाणाऱ्या भक्तांवर आज काळाचा घाला झाला. मनमाड-नगर राज्यमहामार्गावर येवलाजवळ आज शनिवारी पहाटे मालट्रक आणि इंडिका कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात कारमधील तीन जण जागीच ठार झाले. चालकाला डुलकी लागल्याने इंडिका मालट्रकवर धडकली. मृतांमध्ये उच्च न्यायालयातील वकीलाचा समावेश आहे.

कल्याण: अपघातात ३ ठार

Last Updated: Saturday, December 10, 2011, 07:30

आज पहाटे कल्याण मध्ये झालेल्या एका भीषण अपघातात तीन जण ठार झाले. तर पाच जण जखमी झाले. मृतांमध्ये मायलेक आणि एका पंधरा वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. मद्यधुंद कारचालकाच्या चुकीमुळं तिघांना प्राणाला मुकावं लागलं.