ममतांची केंद्र सरकारवरची 'ममता' आटली - Marathi News 24taas.com

ममतांची केंद्र सरकारवरची 'ममता' आटली

झी २४ तास वेब टीम, मुंबई 
पेट्रोल दरवाढीच्या झळा केंद्र सरकारला बसायला सुरवात झाली आहे. गेल्या वर्षभरात ही पेट्रोलची नववी दरवाढ आहे. युपीएच्या घटक असलेल्या ममता बॅनर्जींनी पाठिंबा काढून देण्याचा इशारा सरकारला दिला आहे.
 
महत्वाचे धोरणात्मक निर्णय घेताना आपल्या विश्वासात घेण्यात येत नसल्या बद्दल ममता बनर्जींनी खंत व्यक्त केली आहे. सहयोगी पक्षांच्या पाठिंब्यानेच काँग्रेस सत्तेत असल्याची त्यांनी आठवण करुन दिली आहे. सरकारला तृणमूल काँग्रेसच्या पाठिंबा कायम ठेवायचा का नाही या संदर्भात पंतप्रधान मनमोहन सिंग जी-२० परिषदेवरुन निर्णय घेऊ. युपीएच्या सहकारी पक्षांचा सरकारवर दबाव वाढतोय.

First Published: Friday, November 4, 2011, 13:58


comments powered by Disqus