सोनिया गांधींची संपत्ती किती? - Marathi News 24taas.com

सोनिया गांधींची संपत्ती किती?

www.24taas.com,  नबी दिल्ली
 
लोकसभा निवडणुकीच्या अर्जासोबत सोनियांनी आपल्याकडे १ कोटी ३८ लाख रुपयांची संपत्ती असल्याचे जाहीर केले होते. ही आकडेबारी २००९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीतील आहे.
 
 
त्याआधी २००८-०९ मध्ये आपण ५ लाख ५८ हजार आयकर आणि ३२ हजार ५१२ रुपये संपत्ती कर भरल्याचे सोनियांनी जाहीर केले होते. हा आयकर पाहता सोनियांचे वार्षिक उत्पन्न १६ ते १७ लाख रुपये असावे, परंतु २०१० मध्ये खासदारांचे पगार बक्कळ वाढले. त्यामुळे त्यांचे उत्पन्नही ३७ लाखांवर पोचले आहे. खासदारांचे हे उत्पन्न आयकरमुक्त आहे.
 
 
सोनिया या राष्ट्रीय सल्लागार परिषदेच्या अध्यक्षाही आहेत. या परिषदेवर २०११-१२ या वर्षात ३ कोटी ७७ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. परिषदेच्या सदस्यांनाही घसघशीत मानधन देण्यात येते. सोनियांनी जाहीर केल्याप्रमाणे त्यांच्याकडे ८८ लाख ३३ हजार रुपये रोख आहेत. त्यावर ८.५ टक्के व्याज गृहित धरले तरी सोनियांना ७ लाख ५० हजार रुपये फक्त व्याजाचेच उत्पन्न मिळते, अशी आकडेवारी उपलब्ध झाली आहे.
 
 
सार्वजनिक जीवनात पारदर्शकता यावी, यासाठी बडे नेते आणि प्रशासकीय अधिकारी आपली संपत्तीची माहिती जग जाहीर करतात. मात्र, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना आपली संपत्ती जाहीर करण्याची भीती वाटत आहे. सोनियांच्या मते यामुळे त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा येत असून त्यांच्या सुरक्षेला धोका आहे.
 

संबंधित आणखी बातमी


 
सोनियांना भीती, IT- रिटर्न जाहीर करण्याची भिती 
 
 
 

First Published: Saturday, February 25, 2012, 17:01


comments powered by Disqus