Last Updated: Monday, February 27, 2012, 13:10
www.24taas.com, अहमदाबाद गुजरातमधल्या गोध्रा हत्याकांडाला दहा वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त अहमदाबादमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
‘विश्व हिंदू परिषदे’च्या वतीनं रॅली काढण्यात येणार असून पीडितांना न्याय देण्याची मागणी करण्यात येणार आहे. दहा वर्षांपूर्वी गोधरा कांडात ५९ कार सेवकांचा मृत्यू झाला होता. आयोध्येहून येत असलेल्या साबरमती एक्स्प्रेसच्या एस-6 या कोचला ‘गोधरा’ स्टेशनवर आग लागल्यानं त्यात या कारसेवकांचा मृत्यू झाला. त्यानंतर उसळेलेल्या जातीय दंगलीत १२०० हून अधिक जणांना प्राण गमवावा लागला.
या दंगल प्रकरणातून गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांची अद्याप सुटका झालेली नाही. दंगलींदरम्यान मोदी सरकारनं जाणीवपूर्वक निष्क्रियता दाखवली असा आरोप आहे.
First Published: Monday, February 27, 2012, 13:10