नाशिकच्या विदीतनं रचला इतिहास!

Last Updated: Friday, September 27, 2013, 17:53

नाशिकच्या विदीत गुरराथीनं ‘वर्ल्ड ज्युनियर चेस चॅम्पियनशिप’मध्ये ब्राँझ मेडल जिंकत ऐतिहासिक कामगिरी केलीय.

सिद्धूचं भाषण, भाजपलाच टेन्शन

Last Updated: Tuesday, December 4, 2012, 16:49

आपल्या क्रिकेटमधील फलंदाजीइतकंच आपल्या वक्तव्यांबद्दल प्रसिद्ध असलेल्या नवज्योतसिंग सिद्धूला गुजरातमध्ये प्रचारसाठी भाजपाने बिग बॉस-6मधून बाहेर बोलावून घेतलं. मात्र, त्याच्या बेछुट वक्तव्यांमुळे भाजपलाच कापरं भरलं आहे. त्यामुळे सिद्धूने प्रचारादरम्यान संयमाने बोलावं असे निर्देश त्याला देण्यात आले आहेत.

महाराष्ट्राचा तिसरा ग्रँडमास्टर : विदीत गुजराथी

Last Updated: Wednesday, October 24, 2012, 18:27

बुद्धिबळ क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय ग्रॅँडमास्टर या सर्वोच्च किताबाला गवसणी घालण्याचा पराक्रम नाशिकचा युवा बुद्धिबळपटू विदीत गुजराथी यानं केलाय. अवघ्या अठराव्या वर्षी आंतरराष्ट्रीय ग्रॅँडमास्टर बनणारा विदित हा महाराष्ट्राचा तिसरा ग्रॅँडमास्टर बनलाय.

केशूभाईंनी ओकलं गरळ, म्हणे मोदी 'सडकं फळ'!

Last Updated: Thursday, July 19, 2012, 17:31

गुजराथचे माजी मुख्यमंत्री केशूभाई पटेल यांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदींवर आगपाखड केली आहे. गेल्यावेळी मोदींना हिटलरची उपमा देऊन झाल्यावर यावेळी केशूभाईंनी मोदींना सडक्या फळाची उपमा केली आहे. नरेंद्र मोदी म्हणजे सडकं फळ असून त्यांना फेकून दिलं पाहिजे असं वक्तव्य केशूभाईंनी केलं आहे.

गोध्राकांडातील १८ दोषींना जन्मठेप

Last Updated: Thursday, April 12, 2012, 14:11

गुजरातमध्ये २००२ च्या गोध्राकांडानंतर उसळलेल्या आणंद जिल्ह्यातल्या पिरावली भगोल हत्याकांड प्रकरणी दोषी ठरवलेल्या २३ जणांपैकी १८ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे तर उर्वरित पाच जणांना सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

गोध्रा हत्याकांड आणि नरेंद्र मोदी

Last Updated: Tuesday, February 28, 2012, 13:11

२७ फेब्रुवारी २००२ रोजी गोध्रा स्थानकाजवळ ‘साबरमती एक्सप्रेस’च्या एस-६ बोगीला लावलेल्या आगीत ५९ कारसेवकांचा मृत्यू झाला आणि दुसऱ्याच दिवसापासून सुडाच्या आगीनं गुजरात पेटलं.

गोध्रा हत्याकांडाला दहा वर्षं पूर्ण

Last Updated: Monday, February 27, 2012, 13:10

गुजरातमधल्या गोध्रा हत्याकांडाला दहा वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त अहमदाबादमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

'मोदी' विरुद्ध 'मोदी'

Last Updated: Saturday, February 4, 2012, 16:46

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध आता त्यांच्या छोट्या भावानेच आव्हान दिलं आहे. रेशन दुकानात बारकोड व्यवस्था लागू झाल्यानं नाराज झालेल्या रेशन दुकानदारांनी प्रल्हाद मोदी यांच्या नेतृत्वात आंदोलनाला सुरुवात केली आहे.

गुजरातमध्ये हिंदी भाषा विदेशी!

Last Updated: Monday, January 2, 2012, 17:38

गुजराती जनतेसाठी हिंदी ही भाषा विदेशी असल्याचे स्पष्ट करत राज्य सरकारकडून चालवण्यात येत असलेल्या प्राथमिक शाळांमध्ये गुजराती भाषेतूनच शिक्षण देण्यात यावे, असे आदेश गुजरात उच्च न्यायालयाने दिले आहेत. यामुळे आता महाराष्ट्रात हिंदी विरुद्ध मराठी वाद सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळली इमारत

Last Updated: Tuesday, December 13, 2011, 12:45

सुरतमध्ये एक बिल्डिंग अक्षरशः पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. पाच मजल्यांची ही बिल्डिंग मूळापासून कोसळून पडली. या बिल्डिंगच्या शेजारी दुस-या बिल्डिंगचं बांधकाम सुरू होतं. या बांधकामामुळेच शेजारी असणाऱ्या या बिल्डिंगला हादरे बसले, आणि त्याचा पाया कमकुवत झाला.