Last Updated: Saturday, November 12, 2011, 07:11
झी २४ तास वेब टीम, राळेगणसिद्धी स्वामी अग्निवेश यांच्याशी चर्चा करायला तयार असल्याचं अण्णा हजारेंनी म्हटलंय. स्वामी अग्निवेश यांनी अण्णांची माफी मागितली आहे. त्यावर अण्णांनी प्रतिक्रिया दिली आहे. अग्निवेश यांच्याशी चर्चा करायला तयार असल्याचं अण्णांनी म्हटलंय.
मात्र, स्वामी अग्निवेश यांना माफ करायचं की नाही, त्यावर विचार करू, असं अण्णा म्हणालेत. अण्णांच्या दिल्लीतल्या आंदोलनावेळी स्वामी अग्निवेश यांनी अण्णांवर टीका केली होती. त्यानंतर टीम अण्णांच्या सदस्यांनी स्वामी अग्निवेशांवर टीकास्त्र सोडलं होतं.
First Published: Saturday, November 12, 2011, 07:11