भँवरीदेवी सीडी प्रसारण प्रकरणी नोटीस - Marathi News 24taas.com

भँवरीदेवी सीडी प्रसारण प्रकरणी नोटीस

झी २४ तास वेब टीम, मुंबई
राजस्थानातील माजी मंत्री महिपाल मदेरना आणि भँवरी देवी यांची वादग्रस्त सीडी दाखवल्याची गंभीर दखल सरकारने घेत दोन वृत्त वाहिन्यांना कारवाई का करु नये अशी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या दोन वृत्त वाहिन्यांना ही वादग्रस्त सीडी परत प्रसारित करु नये असे निर्देशही देण्यात आले आहेत.
 
सीडीतील दृश्ये अश्लिल, लहान मुलांनी पाहण्यासारखी नव्हती तसेच अभिरुचीहीन असल्याचे आणि अर्निबंध सार्वजनिक प्रदर्शनासाठी योग्य नसल्याचे या नोटीसमध्ये नमुद करण्यात आलं हे. या दोन्ही वृत्त वाहिन्यांना नोटीस उत्तर देण्यासाठी १४ नोव्हेंबर दुपारी चार वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. तसेच याच मुदतीत आपलं म्हणणं मंत्र्यांच्या समितीसमोर मांडता येणार आहे. या दोन्ही वृत्त वाहिन्यांनी भँवरी देवींवर आधारीत कार्यक्रम प्रसारित केल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या निर्दशनास आल्याचं सूत्रांनी सांगितलं.

First Published: Saturday, November 12, 2011, 11:19


comments powered by Disqus