Last Updated: Friday, March 16, 2012, 15:17
www.24taas.com, नवी दिल्ली यावेळच्या अर्थसंकल्पामध्ये गुंतवणूक वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न केले असल्याचं दिसून आलं आहे. त्यासाठी आयकरामध्ये सवलतही देण्यात आली आहे. अशा प्रकारच्या सवलती गुंतवणूकदारांसाठी फायद्याच्या आहेत आणि आकर्षकही आहेत. यातून शेअर बाजारातील उलाढालही वाढणार आहे. कारण, गुंतवणूकदार अर्धी रक्कम ही शेअर बाजारामध्ये एखाद्या चांगल्या कंपनीचे शेअर खरेदी करून गुंतवू शकतात.
गुंतवणूकदार विमान वाहतूक, ऊर्जा, घरं, फूड प्रोडक्ट्स, कृषी संबंधित वस्तू यांसारख्या क्षेत्रातील कंपन्यांमध्ये गुंतवणूक करू शकतात. याचा गुंतवणूकदारांना फायदा मिळू शकतो.
अर्थसंकल्पामध्ये गुंतवणूकदारांसाठी जरी विशिष्ट तरतुद नसली, तरीही गुंतवणूक वाढावी यासाठी प्रयत्न केल्याचं दिसून येत आहे. परकीय गुंतवणूकीलाही काही प्रमाणात आमंत्रण आहे. बिल्डर्सही ता परकीय गुंतवणूकदारांची मदत घेऊ शकतात. गुंतवणूकीवरील कॅपीटल गेन्स टॅक्समध्ये कुठलाही बदल केला गेला नाही. त्यामुळे आगामी वर्षांत होणाऱ्या भांडवली नफ्यावर कर भरावा लागणार नाही.
याशिवाय बँकिंग आणि कृषीविषयक अर्थसंकल्पान राबवलेल्या योजना या ही गुंतवणूकदारांसाठी आकर्षक ठरू शकतात. राजीव गांधी इक्विटी स्कीममधील गुंतवणूकदारांना रुपये पन्नास हजार पर्यंत उत्पन्नातून सूट मिळू शकते. बॅंकेतील बचत खात्यावरील रुपये दहा हजारपर्यंतचे व्याज करमुक्त असेल. तसंच म्युच्युअल फंडच्या करबचत योजनासुद्धा गुंतवणूकीसाठी येत्या वर्षांत उपलब्ध होतील.
First Published: Friday, March 16, 2012, 15:17